‘कामायनी’तील मुलांना कपडे भेट

‘कामायनी’तील मुलांना कपडे भेट

पुणे, ता. २३ ः अंगावर नवा कोरा सलवार-कुर्ता, स्वादिष्ट खाऊ आणि आवारात गुढीचे पूजन करत कामायनी संस्थेतील विशेष मुलांनी नव्या वर्षाचा आनंद साजरा केला. गुढीपाडव्यानिमित्त कामायनी संस्थेतील विशेष मुलांना सलवार-कुर्ता वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश कोंढाळकर व अनिकेत कोंढाळकर यांच्या पुढाकारातून वेस्ट झोन वस्त्र दालनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोखलेनगर येथील कामायनी संस्थेच्या मुनोत सभागृहात ३०० मुलांना सलवार-कुर्ता देऊन गुढीपाडवा साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह व माजी नगरसेविका प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ भागाचे सह संघचालक सुभाष कदम, मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, व्हीजन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com