मगरपट्टा हॉस्पिटॅलिटी स्टडीज 
कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात

मगरपट्टा हॉस्पिटॅलिटी स्टडीज कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात

पुणे, ता. २३ ः मगरपट्टा हॉस्पिटॅलिटी स्टडीज कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी माजी नगरसेविका हेमलता मगर, प्रमुख पाहुण्या म्हणून मिसेस इंडिया गौरी नाईक, एमसीईएफच्या अध्यक्षा करुणा मगर उपस्थित होत्या. मगरपट्टा कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीजचे (एमसीएचएस) प्राचार्य ज्योती राजू यांनी स्वागत केले.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया - क्रीडा माध्यमातून महिला सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित देशातील महिला खेळांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संध्या मगर, शैलजा मगर, अश्विनी मगर उपस्थित होत्या. या वेळी महाविद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणादरम्यान काम करणाऱ्या महिला बांधकाम कामगारांचा गौरव करण्यात आला. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एमसीआरपीएल कर्मचाऱ्यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. तसेच महिलांसाठी रिले रेस, रस्सीखेच या खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com