सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी ः वासवानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधी परंपरा अधिकाधिक 
लोकांपर्यंत पोहोचावी ः वासवानी
सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी ः वासवानी

सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी ः वासवानी

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः “सिंधी संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३६ वर्ष कार्यरत आहे’’. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यात सहभागी होत असल्याचे सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी म्हणाले.

सिंधी समाजाच्या नववर्षाच्या निमित्ताने भगवान साई झुलेलाल यांच्या १०७३ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला. गायक नील तलरेजाचा लाइव्ह कॉन्सर्ट आणि गायक निशा चेलानीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानीने कार्यक्रमाचे संचालन केले. जनरेशन नेक्स्ट डान्स अॅकॅडमीच्या मुलांनी नृत्य सादर केले. या वेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन वालेचा, बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सह-अधिष्ठाता डॉ. भारती दासवानी, उत्तम केटरर्सचे लकी सिंग यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, पीटर दलवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पर्यानी, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार निलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश जेठवानी यांनी केले तर आभार सचिन तलरेजा यांनी मानले.