रिअल इस्टेट एजंटसाठी सोमवारपासून प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिअल इस्टेट एजंटसाठी 
सोमवारपासून प्रशिक्षण
रिअल इस्टेट एजंटसाठी सोमवारपासून प्रशिक्षण

रिअल इस्टेट एजंटसाठी सोमवारपासून प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : महारेरातर्फे रिअल इस्टेट एजंटना व्यवसाय करण्यासाठी प्रमाणपत्र बाळगणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण महारेरा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत पूर्ण करणे आवश्यक आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’ची शैक्षणिक संस्था असणाऱ्या ‘एसआयआयएलसी’ला या प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. त्या अनुषंगाने ‘एसआयआयएलसी’ मार्फत २० तासांचे ऑनलाइन तसेच तीन दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण घेण्यात येत आहे. नव्याने एजंट होणाऱ्यांना किंवा एजंट रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र बाळगणे आता अनिवार्य आहे. महारेराने याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत (महारेरा आदेश क्र. ४१/२०२३). प्रमाणपत्र नसणाऱ्या एजंटना महारेराच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नोंदणीकृत एजंट्समार्फतच मालमत्ता खरेदी करावी असे आवाहनही महारेराने ग्राहकांना केले आहे.
एप्रिल अखेरपासून यासाठीच्या ऑनलाइन परीक्षा सुरु होणार आहेत. त्याआधी होणारे हे प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेला सामोरे जाण्याची संधी आहे. ऑनलाइन प्रशिक्षणाची पुढील बॅच सोमवारपासून (ता. २७) सुरु होत आहे. ऑफलाइन प्रशिक्षण सोमवार (ता. २७), मंगळवार (ता. २८) व बुधवार (ता. २९) रोजी सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत सकाळनगर, बाणेर रस्ता, पुणे येथे आयोजित केले आहे. महारेराने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग व वास्तुशास्त्र या विषयांच्या अधिकच्या कार्यशाळा प्रशिक्षणात होणार आहेत.

हे लक्षात ठेवा
प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार अधिक जीएसटी.
ऑफलाइन प्रशिक्षणाचे ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ८९५६३४४४७५.
---------------------------
लोगो वापरावा------३२४९८