‘रोटरी’चा वार्षिक पुरस्कार सोहळा मंगळवारी

‘रोटरी’चा वार्षिक पुरस्कार सोहळा मंगळवारी

पुणे, ता. २६ ः रोटरी क्लब ऑफ पुणे अप-टाऊनचा वार्षिक पुरस्कार सोहळा मंगळवारी (ता. २८) आयोजित केला आहे. विविध श्रेणीमध्ये यंदा डॉ. पराग संचेती, डॉ. लता पाडेकर, हरिश्चंद्र सुडे आणि डॉ. ऊर्मिला अस्वार यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पुणे अप-टाऊनच्या अध्यक्षा डॉ. रेणू भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी क्लबचे माजी अध्यक्ष गिरीश लांडगे, अंजली देशमुख, सचिव प्रदीप कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. भारद्वाज म्हणाल्या, ‘‘क्लबच्या वतीने दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यामाध्यमातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. यासाठी व्यावसायिक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षकाला डॉ. सत्तूर पुरस्कार, चिराग पुरस्कार आणि वूमन अचिव्हर्स, असे चार पुरस्कार देण्यात येतात. यंदाचा पुरस्कार सोहळा मंगळवारी (ता. २८) पूना क्लब, कॉन्फरन्स हॉल दोन येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com