डॉ. अंजली कुरणे यांना डॉ. इरावती कर्वे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अंजली कुरणे यांना डॉ. इरावती कर्वे पुरस्कार जाहीर
डॉ. अंजली कुरणे यांना डॉ. इरावती कर्वे पुरस्कार जाहीर

डॉ. अंजली कुरणे यांना डॉ. इरावती कर्वे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः मराठी अन्थ्रोपोलॉजिकल सोसायटीतर्फे देण्यात येणारा ‘डॉ. इरावती कर्वे पुरस्कार’ यंदा मानवशास्त्राच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. अंजली कुरणे यांना जाहीर झाला आहे. कराड तालुक्यातील उंब्रज येथील मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय येथे होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शनिवारी (ता. २५) या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ. कुरणे यांना ३३ वर्षांचा संशोधनाचा व १९ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे.

साने गुरुजी संस्कार साधना संस्थेचे पुरस्कार जाहीर
पुणे, ता. २४ ः साने गुरुजी संस्कार साधना संस्थेतर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देण्यात येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. संस्थेचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. शरद जावडेकर यांना जाहीर झाला आहे. तर साने गुरुजी संस्कार साधना पुरस्कार मनोहर कोलते आणि सुभाष कवडे यांना देण्यात येणार आहे. तसेच, जीवन इंगळे यांना शां. भा. जोशी ग्रंथप्रेमी पुरस्कार, दिलीप काशीद यांना प्रा. प्र. द. पुराणिक आदर्श शिक्षक पुरस्कार आणि यशोदा वाकणकर यांना प्रमिला प्र. पुराणिक महिला सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण रविवारी (ता. २६) दुपारी ४ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशन येथे होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे.

महर्षीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन
पुणे, ता. २४ ः महर्षीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा १६ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. संघाच्या ज्येष्ठ महिलांनी पारंपरिक गाण्यांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. संघाचे संस्थापक-अध्यक्ष अशोक हांडे यांनी ज्येष्ठांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा मानपत्र देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रा. रत्नप्रभा हिरवे, अभय छाजेड, प्रवीण चोरबेले, बाळासाहेब अटल, राजश्री शिळीमकर, कविता वैरागे, मधुकर पवार, राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते. सुरेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. अशोक नांगरे यांनी सूत्रसंचालन केले.