ब्लॉकमुळे पाच दिवस रेल्वे गाड्या रद्द

ब्लॉकमुळे पाच दिवस रेल्वे गाड्या रद्द

पुणे, ता. २४ ः सोलापूर विभागात दौंड-मनमाड सेक्शनमध्ये रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आले असून काही गाड्यांचा मार्ग बदलला आहे. २९ मार्च रोजी पुण्याहून सुटणारी पुणे-हटिया एक्स्प्रेस ही गाडी संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी निघेल.

रद्द केलेल्या रेल्वे गाड्या
२८ मार्च - कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड पुणे एक्स्प्रेस.
२९ मार्च- पुणे-नांदेड एक्स्प्रेस, पुणे नागपूर एक्स्प्रेस.
३० मार्च- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
१ एप्रिल- निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस

या गाड्यांच्या मार्गात बदल
२८ मार्च : कोल्हापूर ते हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस व २९ मार्च रोजी पुणे-बनारस ही रेल्वे लोणावळा-पनवेल-कल्याण-मनमाड मार्गे धावेल. २७ मार्चला हावडा-पुणे व हटिया-पुणे एक्स्प्रेस ही रेल्वे नागपूर -बल्लारशाह-वाडी-सिकंदराबाद-दौंडमार्गे धावेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com