पूर्व पुण्यातील गावांसाठी स्वतंत्र 
हडपसर महापालिका लवकर करावी’

पूर्व पुण्यातील गावांसाठी स्वतंत्र हडपसर महापालिका लवकर करावी’

पुणे, ता. २४ ः ‘‘पुणे महापालिकेकडून हडपसर व पूर्व हवेली तालुक्‍याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एक-दोन गावे तालुक्‍यातून बाजूला काढण्यापेक्षा पूर्व पुण्यातील काही गावे एकत्र करून स्वतंत्र हडपसर महापालिका करण्यात यावी, त्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा,’’ अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत शुक्रवारी केली.

विधानसभेमध्ये तुपे यांनी शुक्रवारी आपल्या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला. तुपे म्हणाले, ‘‘हवेली तालुक्‍याचे महसुली विभाजन करत आहोत, असा शब्द येण्याऐवजी तिथे हवेली तालुक्‍याचे विभाजन झाल्याची चर्चा झाली. महसुली विभाजन झाल्यास एकापेक्षा जास्त तहसीलदार, अधिकारी मिळू शकतील. तसेच पूर्व-पश्‍चिम व मध्य हवेली, असे महसुली विभाग केल्यावर कामामध्ये सूसुत्रता येऊन कामे अधिक सोपी होतील.''''

स्वतंत्र हडपसर महापालिकेबद्दल तुपे म्हणाले, ‘‘हवेली तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे विभाजन करून छोट्या ग्रामपंचायती करण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र, मोठ्या ग्रामपंचायतीमधून कामे होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्याच पद्धतीने आता पुणे महापालिकेकडून पूर्व पुण्यावर, हडपसरकडे लक्ष दिले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हणूनच आता हडपसरची, पूर्व हवेलीतील काही गावे मिळून नवीन महापालिका करावी. वाघोली, लोणी काळभोर, उरुळीकांचन, नायगाव, सोरतापवाडी, थेऊर, फुरसुंगी, वडकी, वडाची वाडी, उंड्री पिसोळी अशी सगळी गावे घेऊन महापालिका केल्यास त्या लोकांना फायदा होईल. त्या पद्धतीने हडपसर, पूर्व पुण्याची स्वतंत्र ‘ब’ दर्जाची महापालिका केल्यास विकास होईल. त्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com