वारजेतील खंडणीखोर शेंडगे टोळीवर मोका

वारजेतील खंडणीखोर शेंडगे टोळीवर मोका

पुणे, ता. २५ : खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापतीसह खंडणी मागणाऱ्या लक्ष्मण ऊर्फ भैय्या शेंडगे याच्यासह त्याच्या साथीदारांवर वारजे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली आहे.

लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडबा शेंडगे (वय २३), स्वामी ऊर्फ काळू खवळे (वय २२), आदित्य मंडलीक (वय २०), अनिल बनसोडे (वय ३०, रा. सर्व, म्हाडा वसाहत, वारजे) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी वारजेतील बिअर शॉपीमध्ये दमदाटी करून जबरदस्तीने बॉक्स हिसकावून घेतले. बिअर शॉपी चालकाने पैसे मागितले असता तू कोणाला पैसे मागतोस, असे म्हणत दुकान चालवायचे असल्यास हप्ता द्यावा लागेल, असे म्हणून शेंडगे आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला धमकावले. सातत्याने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या आरोपींमध्ये सुधारणा होत नसल्याने आरोपींवर मोका कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी तयार केला. सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे तो सादर केला. प्रस्तावाची छाननी करून डहाळे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com