कौटुंबिक न्यायालयाचे पार्किंग अखेर होणार सुरू

कौटुंबिक न्यायालयाचे पार्किंग अखेर होणार सुरू

पुणे, ता. २५ : येथील कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीतील पार्किंग सुरू होण्यास अखेर साडेपाच वर्षांनी मुहूर्त मिळाला. येथील पार्किंग ‘पे-अँड-पार्क’ स्वरूपात दरमहा १० हजार रुपये भाडेतत्वावर सुरू करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार लवकरच हे पार्किंग खुले होणार आहे.
पार्किंगसाठी येथील न्यायालय प्रशासनाने कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटना असलेल्या ‘दी. फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन’कडून किती भाडे आकारावे यावर निर्णय न झाल्याने हे पार्किंग बंद होते. दरमहा १० हजार रुपये भाडे आकारावे, अशी विनंती उच्च न्यायालयातील प्रशासनाकडे केली. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्याने काही दिवसात कौटुंबिक न्यायालयात पार्किंग सुरू होणार असल्याची माहिती दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष ॲड. वैशाली चांदणे यांनी दिली. दरम्यान त्वरित पार्किंग सुरू न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. गणेश कवडे यांनी दिला होता.
सर्व सुविधायुक्त कौटुंबिक न्यायालयाचे उद्‌घाटन १२ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रमुख न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत झाले होते. तेव्हापासून पार्किंगचा प्रश्‍न प्रलंबित आहे. तळमजल्यावरील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांसाठीचे पार्किंग सुरू आहे. मात्र, भुयारी असलेले वकील आणि पक्षकारांसाठी पार्किंग सुरू झालेले नव्हते. त्यामुळे येथील वकील शिवाजीनगर न्यायालयात गाडी लावत होते. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयातील पार्किंग अपुरे पडू लागले होते.

कौटुंबिक न्यायालयातील पार्किंगचा प्रश्‍न प्रलंबित होता. मात्र, उच्च न्यायालयाने पार्किंग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यासाठी १० हजार रुपये भाडे निश्‍चित झाले असून लवकरच पार्किंग सुरू होईल. वकील, पक्षकारांना याचा फायदा होणार आहे.
-ॲड. वैशाली चांदणे, अध्यक्षा, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com