फळे-भाजीपाला कॅनिंग प्रक्रिया तंत्र, व्यवसाय संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फळे-भाजीपाला कॅनिंग
प्रक्रिया तंत्र, व्यवसाय संधी
फळे-भाजीपाला कॅनिंग प्रक्रिया तंत्र, व्यवसाय संधी

फळे-भाजीपाला कॅनिंग प्रक्रिया तंत्र, व्यवसाय संधी

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी ते हवाबंद डब्यांत वा बाटल्यांत भरून ठेवण्याची प्रक्रिया करावी लागते. याला कॅनिंग म्हणतात. काय आहे हे कॅनिंग तंत्रज्ञान, त्याचे फायदे, फळे-भाजीपाल्यात कॅनिंगची प्रक्रिया नेमकी कशी करतात, त्याचे तंत्रज्ञान याबाबत सखोल मार्गदर्शनपर विकेंड सर्टिफिकेट कोर्स १ व २ एप्रिल रोजी आयोजिला आहे.
कॅनिंग प्रक्रियेत उष्णतेने डब्याचे व खाद्यपदार्थाचे निर्जंतुकीकरण करावे लागते. कोर्समध्ये कॅनिंग तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारी आवश्यक मशिनरी, प्रोजेक्ट प्लॅनिंग, प्रोजेक्ट व ऑपरेशन्स मॅनेजमेंट, लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूक इ.विषयी टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार राजन वारे हे मार्गदर्शन करणार आहेत. फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी इ.साठी कोर्स फायदेशीर आहे.

कोर्समधील विषय
- कॅनिंग अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान ओळख, संधी
- स्थानिक, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास
- स्टॅच्युटरी ॲण्ड रेग्युलेटरी कंप्लांयन्सेस
- कॅनिंग पदार्थांचे पॅकेजिंग, लेबलिंग
- कॅनिंग प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा

हे लक्षात ठेवा
ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ५ प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये.
नावनोंदणी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१