भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयात कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय कला प्रसारिणी सभेच्या 
वास्तुविद्या महाविद्यालयात कार्यक्रम
भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयात कार्यक्रम

भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयात कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्‌घाटन आणि ‘बी. एम. पाठक सर्वोत्कृष्ट डिझाईन पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले.
संस्थेचे सचिव पुष्कराज पाठक यांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट आर्किटेक्टचे सचिव सतीश माने, ज्येष्ठ वास्तुतज्ञ अरविंद पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. पुष्कराज पाठक म्हणाले, ‘‘सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणे हाच प्रगतीचा राजमार्ग आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले वास्तुविधान आणि सादर केलेल्या आराखड्यांमध्ये निश्चितच कल्पकता आहे. त्यातून विद्यार्थ्यांची वास्तूकलेची समृद्ध दृष्टी देखील दिसते.’’ कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अभिजित नातू यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुष अग्रवाल यांनी केले. तर प्राध्यापक अतुल भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले.