जावडेकर पीसी

जावडेकर पीसी

मोदींमुळे भारताला जगात
मानाचे स्थान ः जावडेकर

पुणे, ता. २ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘देश प्रथम'' हे धोरण आणि ''संन्यस्त कर्मयोगी'' ही प्रतिमा देशाला पुढे नेत आहे. त्यामुळे जगात भारताला मानाचे स्थान मिळाले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, जनतेचा मोदींवर विश्वास आहे. हीच आमची मोठी ताकद आहे. त्याच्या जोरावर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर एनडीएचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. भाजप पुन्हा सत्तेत येईल. २०२४ नंतर विकासाची गती आणखी वाढेल.
गेल्या नऊ वर्षांत दहशतवादी हल्ले थांबले. नक्षलवाद्यांचे वर्चस्व ९० टक्के कमी झाले. त्यामुळे शांतता निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. गॅस, इंधन दरवाढीबाबत विचारले असता त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचे कारण दिले.
२०१४ पूर्वी भारत हा पहिल्या पाच कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत होता. पण आता भारत हा सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला उत्तम यश मिळाले. जगात सर्वात जास्त डिजिटल व्यवहार भारतात होतात. भीम, यूपीआय, को-विन ही ॲप सर्वोत्कृष्ट ठरली. युरोपातील अनेक देशात मंदीचे सावट असताना भारताची वेगवान प्रगती चालू आहे. गरीबी एक टक्के पेक्षा कमी आणि बेरोजगारीचा दरही कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आदी यावेळी उपस्थित होते.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com