फरारी आरोपीला १२ वर्षांनी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरारी आरोपीला
१२ वर्षांनी अटक
फरारी आरोपीला १२ वर्षांनी अटक

फरारी आरोपीला १२ वर्षांनी अटक

sakal_logo
By

पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूरमध्ये कारवाई करून त्याला पकडण्यात आले. अशोक गुराप्पा वैदू (वय ५३, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. २०११ मध्ये त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर तो फरार झाला होता. तो कायम पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. अमली पदार्थ विरोधी पथक माहिती घेत असताना त्यांना वैदू हा राहत्या घरी आला असल्याचे समजले. त्यानुसार, सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला राहत्या घरातून सापळा रचून पकडले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे सांगितले. त्याला पुढील कारवाईसाठी लष्कर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.