मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य महाराष्ट्रात आज
पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार होत असताना पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली असून शनिवारी (ता. ३) मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शुक्रवारी (ता. २) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे ४३.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पारा ४० अंशांच्या दरम्यान असून उन्हाचा ताप वाढू लागला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये पावसाची नोंद झाली. सध्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्यावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून दक्षिण ओरिसा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यात राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, शनिवारी (ता. ३) विदर्भासह, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकणात विजांसह पावसाची अंदाज आहे. तर उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची चिन्हे असून अरबी समुद्राच्या आग्नेय भागात सोमवारी (ता. ५) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या बुधवारपर्यंत (ता. ७) तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते, असेही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.