खंडणीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीचा गुन्हा दाखल
खंडणीचा गुन्हा दाखल

खंडणीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. २ : दोन लाख रुपयांच्या बदल्यात दोन लाख ४० हजार रुपये परत करूनही एक लाख ८० रुपयांची अवाजवी मागणी करून धमकी देणाऱ्याविरुद्ध खंडणीविरोधी पथक-२ ने खंडणी आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सूरज शशिकांत म्हेत्रे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील एका व्यक्तीने सूरज म्हेत्रे याच्याकडून २०२१ मध्ये दोन लाख रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्याच्या बदल्यात आरोपीने मुद्दल आणि व्याज असे एकूण दोन लाख ४० हजार रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात परत केले होते. परंतु पैसे परत करूनही सूरज म्हेत्रे याने फिर्यादीला मोबाईलवरून शिवीगाळ केली. मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत फिर्यादीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला. या अर्जाची चौकशी करून खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.