जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पेंट द रिव्हर’ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पेंट द रिव्हर’ कार्यक्रम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पेंट द रिव्हर’ कार्यक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘पेंट द रिव्हर’ कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे रिव्हर रिव्हायवल संस्थेतर्फे ‘पेंट द रिव्हर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत चित्रकार मिलिंद मुळीक मुळा नदीकिनारी नदीच्या मूळ स्वरूपाचे प्रात्‍यक्षिक नागरिकांना दाखविणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
महापालिकेच्या नदीकाठ सुधार या प्रकल्पांतर्गत नदी काठची झाडे तोडू नये यासाठी नुकतेच आंदोलन केले होते. दरम्यान एनजीटीनेही आता याबाबत आदेश देत महापालिकेच्या या प्रकल्पांतर्गत नदी काठची झाडे न तोडण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेतर्फे या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत रविवारी (ता. ४) सायंकाळी ५ वाजता मुळा-मुठेच्या किनारी बंडगार्डन येथे नदीभेटीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ‘पेंट द रिव्हर कार्यक्रम’ पर्यावरण दिनी (ता. ५) दुपारी साडेचार वाजता होळकर पूल खडकी येथील राजीव गांधी उद्यानात होणार आहे.