मानवनिर्मित देवराईसाठी मदत करणार : ढोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवनिर्मित देवराईसाठी मदत करणार : ढोले
मानवनिर्मित देवराईसाठी मदत करणार : ढोले

मानवनिर्मित देवराईसाठी मदत करणार : ढोले

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : ‘‘पर्यावरण रक्षणासाठी ‘देवराई’ महत्त्वाची आहे. त्यासाठी देवराई फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘मानवनिर्मित देवराई’ व ‘घनवन’ या बाबी सर्वांना उपलब्ध करून देत आहोत’’, अशी माहिती फाऊंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी रघुनाथ ढोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘‘देवराईसाठी एक एकर जागेत ११९ प्रकारच्या ५१५ वनस्पती व त्यासाठीचा लागवड आराखडाही विनामूल्य दिला जाणार आहे. घनवन हे एक गुंठा जागेतही तयार करता येते. त्यात ३ फूट खड्डा करून त्यात प्लास्टिक सोडून अन्य कुजणारा कुठलाही कचरा भरून त्यावर १ फुट माती भरून १ मीटर अंतरावर देशी वृक्ष लावून कमीत कमी खर्चात घनवन करणे शक्य आहे. ‘देवराई’ म्हणजे स्वर्ग आणि या स्वर्गाची निर्मिती करायची आहे, अशी भावना या वेळी ढोले यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, यासाठी फाऊंडेशनच्या वतीने रोपांचे विनामूल्य वाटप करणार आहोत.’’
फाऊंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत २०० मानवनिर्मित देवरायांची लागवड करून आगामी काळात एक हजार देवराया निर्माण करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी फाऊंडेशनचे सल्लागार हितेंद्र सोमाणी उपस्थित होते.