Sat, Sept 23, 2023

‘पुणे डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २’ अव्वल
‘पुणे डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २’ अव्वल
Published on : 3 June 2023, 12:27 pm
पुणे, ता. ३ : लायन्स इंटरनॅशनलचे सहावे वार्षिक मल्टिपल ३२३४ चे बहुप्रांतीय अधिवेशन नागपूर येथे पार पडले. यामध्ये पुण्याच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ ने विक्रम करीत ७४ सुवर्ण आणि रौप्य पदके पटकावली व संपूर्ण प्रांतांत अव्वल ठरला. मुंबई वगळता उर्वरित असा विस्तीर्ण प्रदेश असलेले मल्टिपल ३२३४ चे हे अधिवेशन होते. या वेळी प्रांतपाल राजेश कोठावदे यांची मल्टिपल कौन्सिल ट्रेझरर म्हणून निवड झाली. तसेच विविध प्रांतांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सुवर्ण आणि रौप्य पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. मनोज बलगट, भूषण महाजन, रवींद्र गोलर, अनिल झोपे, पल्लवी देशमुख, प्रवीण गुलाटी, सचिन शहा यांना सुवर्ण सन्मान देऊन गौरविण्यात आले.