
‘लायन्स’चे बहुप्रांतीय अधिवेशन उत्साहात
पुणे, ता. ३ : लायन्स इंटरनॅशनलचे सहावे वार्षिक मल्टिपल ३२३४ चे बहुप्रांतीय अधिवेशन नागपूर येथे झाले. त्यात पुण्याचा ‘डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २’ ने विक्रम करीत ७४ सुवर्ण आणि रौप्य पदके पटकावली. मुंबई वगळता उर्वरित असा विस्तीर्ण प्रदेश असलेले मल्टीपल ३२३४ चे हे अधिवेशन होते.
प्रांतपाल राजेश कोठावदे यांची मल्टिपल कॉन्सिल ट्रेझरर म्हणून निवड झाली. तसेच विविध प्रांताच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सुवर्ण आणि रौप्य पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. मनोज बलगट, भूषण महाजन, रवींद्र गोलर, अनिल झोपे, पल्लवी देशमुख , प्रवीण गुलाटी, सचिन शहा यांना सुवर्ण सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आले. तसेच लिओच्या उत्कृष्ट कार्याबद्दल ६ अधिकाऱ्यांना गोल्ड आणि सिल्वर सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. राज मुछाल, गिरीश मालपाणी, बी.एस. जोशी, जितेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.