Wed, October 4, 2023

पर्यावरणविषयक जागृतीसाठी सायकलवारी
पर्यावरणविषयक जागृतीसाठी सायकलवारी
Published on : 3 June 2023, 3:00 am
पुणे, ता. ३ : शहरात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या बैठकीनिमित्त पुणे महापालिकेकडून नागरिकांमध्ये जी-२० परिषदेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी पुणे ते पंढरपूर सायकलवारी काढण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महापालिका प्रशासनाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महापालिकेच्या सायकल क्लबमार्फत वर्षभर पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. शहरात सायकलस्वारांची संख्या वाढावी, नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण याबाबत जागृती निर्माण व्हावी आणि जी २० परिषदेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.