अंध शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंध शाळेच्या विद्यार्थ्यांचे
दहावी परीक्षेत घवघवीत यश
अंध शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

अंध शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

sakal_logo
By

पुणे : दि पूना स्कूल अँड होम फॉर दि ब्लाइंड, ट्रस्टद्वारे संचालित कोथरूड व कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या (एसएससी) परीक्षेत घवघवीत यश मिळविले. दोन्ही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. कोथरूड येथील मुलींच्या शाळेतून अंबिका गवते ही ८८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्याचबरोबर गायत्री मिटकरी (८३ टक्के) व रिया गावंडे (८२.२० टक्के) मिळवून दोघींनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. तसेच कोरोगाव पार्क येथील मुलांच्या शाळेतून रोहित टकले याने ७४.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याचबरोबर विश्वनाथ देशमुख (७३.८० टक्के) व कृष्णल शिंदे (७२.२० टक्के) मिळवून दोघांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.
पुणे अंध शाळेच्या कोथरूड व कोरेगाव पार्क निवासी शाळांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील गरजू पाच ते अठरा वयोगटातील जवळपास तीनशेहून अधिक अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण, कौशल्याधिष्टित व्यवसायभिमुख प्रशिक्षण, हस्तकला, संगीत कला प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.