जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे यश
जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे यश

जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या योजनेअंतर्गत ११ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत भरारी घेत उत्तम कामगिरी केली आहे.
योजनेतील मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रेमराज गोयकर याने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण पटकाविले आहेत. धुळे येथील कोठारे बोरसुले गावात राहणाऱ्या प्रेमराज याचे वडील शेतकरी असून भविष्यात त्याला आयआयटी उत्तीर्ण करायचे आहे. प्रज्ञा जाधव हिने ९०.२० टक्के गुण प्राप्त केले आहेत. प्रज्ञा ही जनवाडी गोखलेनगर परिसरात राहात असून तिचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या त्रिशा गोसकेने ८९.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत.
याशिवाय प्रज्वल केदारी, तेजस मोरे, हर्षवर्धन खोपडे, गणेश भगत, स्नेहा मराठे, सिद्धार्थ शेडे, निर्मिती ओव्हाळ, कुणाल दिघे यांनी उत्तुंग यश पटकविले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, २०१० पासून ही योजना सुरु असून विद्यार्थ्यांना संस्कार वर्ग, समुपदेशन, शिकवणी, परीक्षा, शैक्षणिक साहित्य, एक लाख रुपयांचा विमा या सर्व सुविधा दिल्या जातात, असे ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी सांगितले.