पिंपरी-भोसरी-चाकणमध्ये भारनियमन

पिंपरी-भोसरी-चाकणमध्ये भारनियमन

पिंपरी, चिंचवड, भोसरीत
वीजपुरवठा थोडा वेळ बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ४ : विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणच्या चाकण व लोणीकंद येथील ४०० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी अतिभाराचा (ओव्हरलोड) धोका टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेद्वारे काही उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पिंपरी, चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, मोशी, नाशिक रोड तसेच चाकण एमआयडीसी अंतर्गत काही गावांचा वीजपुरवठा रविवारी दुपारी २.३० नंतर अर्धा ते दीड तासांपर्यंत बंद ठेवण्यात आला होता.
या उपकेंद्रामधील अतिरिक्त भाराचे व्यवस्थापन शक्य नाही. यामुळे पिंपरी विभागात चिंचवड गाव, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, वाकड व पिंपरीच्या काही भागांत दीड तास; भोसरी विभागात भोसरी, नाशिक रोड, मोशी व भोसरी एमआयडीसीमधील भागांत सुमारे एक तास तसेच राजगुरुनगर विभागात चाकण एमआयडीसीमधील नाणेकरवाडी, कुरुळी, चिमळी, म्हाळुंगे, निघोजे, खालुंब्रे, सावरदरी, वासुली, शिंदे, बांभोली, वराळे, येलवडी, सांगुर्डी या गावांमधील रहिवासी, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा ३.३० ते ४ वाजेपर्यंत अर्धा तास बंद ठेवावा लागला.
दरम्यान, वादळामुळे केसनंद येथे एका दुकानाच्या लोखंडी पत्र्याचा फलक वीजखांबावर पडला. खांब वाकल्याने वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे केसनंद गाव व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. महापारेषणच्या लोणीकंद ते काटापूर आणि लोणीकंद ते रांजणगाव या २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचेही आवश्यक काम सुरु असल्याने दुपारी ४.३० वाजता वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे वढू खुर्द, तुळापूर, फुलगाव इस्टेट आदी परिसरांतील सुमारे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, असेही महावितरणने कळविले आहे.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com