Wed, Sept 27, 2023

सीडॅकबरोबर सामंजस्य करार
सीडॅकबरोबर सामंजस्य करार
Published on : 5 June 2023, 12:55 pm
पुणे, ता. ५ : सी-डॅक आणि ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘ऑगमेंटेड रियालिटी अँड व्हर्च्युअल रियालिटी’ या विषयावरील अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संगणकाचा वाढता वापर प्रभावी करून आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘नॅसकॉम’चे प्रमाणपत्र मिळणार आहे. प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकारातून सी-डॅकमधील वैशाली महेशकर व अंकुर गजभिये यांच्या सहकार्याने हा सामंजस्य करार झाला. केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक कल्याण जाधव यांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.