पर्यावरण दिनानिमित्त ‘निसर्गनाद’ उपक्रम साजरा

पर्यावरण दिनानिमित्त ‘निसर्गनाद’ उपक्रम साजरा

पुणे, ता. ५ : जागतिक पर्यावरण दिन, ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्षारंभ आणि वटपौर्णिमेचे औचित्यसाधून बायोस्फिअर्स, इकोस्फिअर, व्हॉइस ऑफ वाइल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ३) झपुर्झा, कुडजे येथे निसर्गनाद या पंचमहाभूतांवर आधारित उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश तत्वातील नाद हा नृत्य आणि दृकश्राव्य माध्यमातून मांडले. यावेळी पंचतत्वाशी निगडित असणाऱ्या विषयांत काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, अशी माहिती बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी सोमवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत दिली.
यामध्ये रमेश मोगल, उपेंद्र धोंडे, मारुती गोळे, विवेक मुंडकुर, अथर्व पाठक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पर्यावरण आणि जैव विविधतेबाबतीत काही लघुपटांचे सादरीकरण आणि माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले.
दरम्यान, ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्षारंभानिमित्त नृत्याच्या माध्यमातून कलाकारांनी ‘शिववंदना’ सादर केली. यात श्वेता लक्ष्मीनरसिम्हन, मानसी काळे, सानिका चव्हाण, क्षितिजा घाणेकर, मैथिली कुलकर्णी, वेदिका कुलकर्णी आदी कलाकारांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची संकल्पना डॉ. सचिन पुणेकर व निवेदिता जोशी यांची होती. इंद्रजितसिंह घोरपडे-गजेंद्रगडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com