अनिल बेलकर यांना ‘श्री’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल बेलकर यांना ‘श्री’ पुरस्कार
अनिल बेलकर यांना ‘श्री’ पुरस्कार

अनिल बेलकर यांना ‘श्री’ पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठीचा राज्यस्तरीय ‘श्री पुरस्कार’ पुणे येथील ‘केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रक्टचे सचिव अनिल बेलकर यांना माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सांगली येथे राज्यस्तरीय ‘श्री पुरस्कार २०२३’चा वितरण सोहळा पार पडला. बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनतर्फे याचे वितरण करण्यात आले. हे पुरस्काराचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. बेलकर म्हणाले, ‘‘या पुरस्काराचे श्रेय मी माझ्या सर्व केमिस्ट सभासदांना देतो, औषध विक्रेत्यांच्या संघटनेचे अध्यक्ष शिंदे यांचे मार्गदर्शन यात महत्त्वाचे आहे.’’
या कार्यक्रमासाठी दत्तप्रसाद टोपे, रोहित करपे, योगेश काळे, संजय खोपडे, प्रशांत राऊत, मुरली कुंबरे, जगदीश रगडे, शिवाजी गदादे, हर्षद चव्हाण, तन्मय कुलकर्णी, संतोष शहा व इतर सभासद उपस्थित होते.