वारीत यंदा ‘आनंदडोह-आनंदवारी’

वारीत यंदा ‘आनंदडोह-आनंदवारी’

पुणे, ता. ५ ः जगद्गुरू संत तुकराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यंदाच्या वर्षी ‘संवाद पुणे’च्या माध्यमातून संत तुकराम महाराज यांचे जीवन ‘आनंदडोह-आनंदवारी’ या एकपात्री प्रयोगातून अभिनेते योगेश सोमण सादर करणार आहेत. हा पावणे दोन तासांचा कार्यक्रम असणार आहे. शुक्रवार नऊ जून रोजी देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूल येथे सायंकाळी पाच वाजता पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते याचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे, पालखी प्रमुख संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अभिनेते योगेश सोमण हे संत तुकारामांच्या वेशभूषेत असतील. ते विविध विषयांवर निरूपण सादर करतील. हा कार्यक्रम देहू, पुणे, लोणी, सासवड, वरवंड, इंदापूर, अकलूज, वेळापूर, वाडी पुरवली, व पंढरपूर या ठिकाणी सादर होणार आहे. यासाठी पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे २०० विद्यार्थी कार्यक्रमाचे व्यवस्थापन करतील. या पत्रकार परिषदेस सुनील महाजन, सदानंद भोसले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com