शब्दरुपी देवाची वि शब्दरुपी देवाची विटंबना वाढतेय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शब्दरुपी देवाची वि
शब्दरुपी देवाची विटंबना वाढतेय
शब्दरुपी देवाची वि शब्दरुपी देवाची विटंबना वाढतेय

शब्दरुपी देवाची वि शब्दरुपी देवाची विटंबना वाढतेय

sakal_logo
By

शब्दरुपी देवाची विटंबना वाढतेय ः डॉ. मोरे
राजारामबापू पाटील ललित कला पुरस्काराने सन्मान

पुणे, ता. ५ ः साहित्य श्रेष्ठ की कला याबाबत मतमतांतरे आहेत. पण काय श्रेष्ठ हे पाहण्यापेक्षा भाषा व्यवहार महत्त्वाचा असतो. प्रगल्भ समाजनिर्मितीसाठी विचारवंत व कलावंत या दोघांची गरज असते, पण सध्याच्या काळात शब्दरूपी देवाची विटंबना होताना दिसत आहे, अशी खंत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केली.
राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्यावतीने साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय योगदानाबद्दल सुरु करण्यात आलेला पहिला लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवनगौरव पुरस्कार डॉ. मोरे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, आता प्रतिभावंत आहेत. पण मोबाइलच्या जमान्यात कदर करणारे लोक राहिलेले नाहीत. त्यामुळेच प्रतिभावंतांचे योग्य वेळी कौतुक करण्यासाठी हे व्यासपीठ सुरु केले आहे.
माजी आमदार विलास लांडे, प्रा. प्रदीप पाटील, सुनिताराजे पवार, अंकुश काकडे, अन्य पुरस्कारार्थी मंगेश काळे, मोनिका गजेंद्रगडकर आणि प्रा. इंद्रजित भालेराव यांचे चिरंजीव चंद्रगुप्त आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या समारंभात मंगेश काळे (चित्रकला), प्रा. इंद्रजित भालेराव (काव्यनिर्मिती) आणि मोनिका गजेंद्रगडकर (कथानिर्मिती) यांना ललित कला पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. भालेराव यांचा पुरस्कार त्यांचे चिरंजीव चंद्रगुप्त यांनी स्वीकारला. मंगेश काळे यांनी पुरस्काराची रक्कम आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करीत असलेल्या अनिल साबळे यांना देत असल्याचे जाहीर केले. प्रा. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक, तर विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.
---

नेते माईकवर खोटे बोलतात ः उल्हास पवार
सध्या शब्द जपून वापरण्याचा काळ आला आहे. प्रत्येकाने वाणी आणि पाणी जपून वापरले पाहिजे. कारण वाणी वर्तमान, तर पाणी भविष्यकाळ खराब करू शकते. भौतिक विकास होणे, ही काळाची गरज आहे. पण सांस्कृतिक विकास आंधळा होऊन चालणार नाही. साहित्य, कला, कादंबरी, चित्रकला अशा विविध कलांच्या माध्यमांमधून व्यक्त होता येते. पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग स्थान निर्माण केले आहे. राजकारणी खासगीत खरे बोलतात. पण ते माईकवर खोटे बोलतात. राजकारणी माईकवर खरे बोलतील, तेव्हाच ती खरी लोकशाही ठरेल, असे उल्हास पवार यांनी सांगितले.
-----