
रिंगरोडसाठी वनविभागाकडे प्रस्ताव
पीएमआरडीएची रिंगरोडसाठी
वनविभागाकडे जमिनीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ५ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती रिंगरोडसाठी वनविभागाकडील सुमारे ४७ हेक्टर जमीन मिळावी म्हणून मागणी केली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ८८ किलोमीटर लांबीचा आणि ६५ मीटर रुंदीचा आहे. परंदवाडी (ता. मावळ) ते सोळू (ता.खेड) दरम्यानचा ४० किलो मीटर लांबीचा रिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. प्राधिकरणाकडील उर्वरित रस्त्याची रुंदी ६५ मीटर करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यास शासनाने नोव्हेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली आहे. यासंदर्भात पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप म्हणाले,‘‘ ६५ मीटर रुंद रिंगरोड प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल व भूसंपादन प्रस्ताव सल्लागारामार्फत तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यासाठी सोलू, निरगुडी व वडगाव शिंदे या तीन गावांतील भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आले आहेत. तथापि ८८ पैकी सुमारे ४७ हेक्टर वनजमीन संपादनाचा प्रस्ताव वनविभागाला पाठविण्यात आला आहे.’’
-----