लाच मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

लाच मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पुणे, ता. ६ : वाघोली येथील तलाठ्याच्या नावे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोघा मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब भिकाजी गिरी (वय ५६, रा. आव्हाळवाडी, वाघोली, जि. पुणे) आणि संजय मारूती लाड (वय ५३, रा. साईनगर, लोहगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी वाघोली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर मदतनीस भाऊसाहेब गिरी आणि संजय लगड यांनी तलाठी पटांगे यांच्याकडून काम करून देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपींनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com