वाघोली, केसनंद आदी भागात भारनियमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोली, केसनंद आदी भागात भारनियमन
वाघोली, केसनंद आदी भागात भारनियमन

वाघोली, केसनंद आदी भागात भारनियमन

sakal_logo
By

वीजवाहिनीतील बिघाडामुळे
पुणे परिमंडळात भारनियमन
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ : महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही क्षमतेच्या कराड ते लोणीकंद या अतिउच्चदाब वीजवाहिनीत बुधवारी (ता. ७) सकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे उरुळी कांचन, वाघोली, पेरणे आदी भागांत सकाळी ९.३० वाजेपासून प्रत्येकी दीड तास चक्राकार पद्धतीने दिवसभर भारनियमन करावे लागले. कोयना टप्पा ४ मधून निर्माण होणाऱ्या विजेचे कराड ते लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीद्वारे पारेषण होते. बिघाडामुळे पुणे परिमंडळ अंतर्गत पुरवठा होणाऱ्या सुमारे ५० ते ६० मेगावॉट विजेचे पारेषण ठप्प झाले. ही तूट भरून काढण्यासाठी उरळी कांचन, वाघोली, केसनंद, पेरणे, सरतापवाडी, कोरेगाव मूळ, वाडेबोल्हाई, आष्टापूर, नायगाव आदी गावे व परिसरात तात्पुरते भारनियमन करावे लागले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर तात्पुरते भारनियमन मागे घेण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
------