महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या
अध्यक्षपदी ललित गांधी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी

पुणे, ता. ७ ः ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर’ संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. चेंबरच्या अध्यक्षपदासाठी गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी तीन अर्ज होते. त्यातील दोघांनी अर्ज मागे घेतल्यामुळे लोढा यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे यांनी काम पाहिले. गांधी गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असून गव्हर्निंग काउन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. लोढा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे दोनदा उपाध्यक्षपद भूषविले आहे. ते गेल्या २० वर्षांपासून चेंबरशी संलग्न आहेत. मागच्या चार कार्यकारिणी मंडळात त्यांनी प्रतिनिधित्व केले हाते. २०१६ ते २०२१ या कालावधीत ते उपाध्यक्ष होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. १६ जूनला सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये या सोहळ्याचे नियोजन केले असून, निर्वाचित अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ या वेळी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com