पालखी आगमनानिमित्त पुण्यात वाहतूक बदल

पालखी आगमनानिमित्त पुण्यात वाहतूक बदल

पुणे, ता. ७ : संत श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात १२ जूनला एकत्रित येत आहेत. या दोन्ही पालख्यांच्या आगमनामुळे शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्ग आणि परिसरातील वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत. शहरातील काही मार्ग पहाटे दोन वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत, तसेच पालखीदरम्यान मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी राहील. पालखी पुढे जाईल, त्यानुसार वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी आगमन मार्ग
संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग : १२ जूनला विठ्ठल मंदिर आकुर्डी येथून निघून चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्टेशन, मरिआई गेट चौक, वाकडेवाडी पाटील इस्टेट चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक.

वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
- बोपोडी चौक ते खडकी बाजार (अंतर्गत रस्त्याने चर्च चौक)
- चर्च चौक (भाऊ पाटील रोड ब्रेमेन चौक औंधमार्गे).
- पोल्ट्री फार्म चौक (रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रस्ता ब्रेमेन चौक).
- मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक (अंतर्गत रस्त्याचा वापर करावा).
- चर्च चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक-जुना मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व वाहने बंद करण्यात येतील. (बोपोडी चौकातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रस्त्यावरून औंध रस्तामार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे).
- आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक (आरटीओ चौक - शाहीर अमर शेख चौक - कुंभार वेस चौक किंवा आरटीओ चौक- जहाँगीर चौक आंबेडकर सेतू ते गुंजनमार्गे).
- सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक (पर्णकुटी चौक-बंडगार्डन पूल-महात्मा गांधी चौकमार्गे).

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन मार्ग
श्री क्षेत्र आळंदी येथून पालखी १२ जूनला निघून वडमुखवाडी चऱ्होली फाटा, दिघी मॅगझीन, बोपखेल फाटा, बीईजी ट्रेनिंग बटालियन २, म्हस्के वस्ती कळस ओढा, विश्रांतवाडी, फुलेनगर, साप्रस चौकी, चंद्रमा चौक, डावीकडे वळून सादलबाबा चौक, उजवीकडे वळून संगमवाडी रस्त्याने पाटील इस्टेट चौक, डावीकडे वळून इंजिनिअरिंग कॉलेज चौक.

वाहतुकीसाठी बंद रस्ते आणि कंसात वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
- कळस फाटा से बोपखेल फाटा, विश्रांतवाडी चौक (धानोरी आणि अंतर्गत रस्त्याने).
- मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रोड जंक्शन (जेल रोड- विमानतळ रोड मार्ग).
- सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रस्ता (पर्णकुटी चौक -गुंजन चौक -जेल रोड- विश्रांतवाडी चौक).
- चंद्रमा चौक ते आळंदी रोड (अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा).
- नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद. होळकर पूल ते चंद्रमा चौक आणि होळकर पूल ते साप्रस चौकी मार्ग बंद.
या कालावधीत फक्त आळंदीकडे जाणारे रस्ते बंद राहणार असून, इतर रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील.


पालखी सोहळ्यातील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीचे ‘लाइव्ह लोकेशन’ कळणार असून, त्यानुसार वाहतूक नियंत्रित करण्यात मदत होणार आहे.
- पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ॲप.
- सीसीटीव्हीद्वारे वाहतुकीवर ‘वॉच’
- दिंडीत अंतर पडल्यास रस्त्याच्या दोन्ही बाजूचे बॅरिकेड॒स किंवा रोप काढून वाहनांना मार्ग खुला करून देणार.
- पालखी मार्गावरील मेट्रोची कामे बंद ठेवण्यात येणार आहेत.

सुमारे एक हजार वाहतूक पोलिस तैनात
पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वाहतूक नियमनासाठी पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ९७५ पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com