दिव्यांग राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम

दिव्यांग राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम

पुणे, ता. २६ ः राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित चौथ्या राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘महाराष्ट्र समाज सेवा संघ रचना विद्यालय, नाशिक’ या संस्थेच्या ‘रिले’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. गोरेगाव येथील रोटरी संस्कारथाम चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘गोदा’ या नाटकास द्वितीय क्रमांक आणि सोलापुरच्या ‘राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर ब्लाइंड’ या संस्थेच्या ‘जत्रा’ या नाटकास तृतीय क्रमांक जाहीर झाला.

‘रिले’ या नाटकाला सांघिक प्रथम क्रमांकासह दिग्दर्शनासाठी धनंजय वाबळे यांना आणि प्रकाशयोजनेसाठी कृतार्थ कंसारा यांना प्रथम क्रमांक मिळाला. दिग्दर्शनसाठी द्वितीय क्रमांक जयेश जोशी, तृतीय क्रमांक अनिकेत भोईर यांनी आणि प्रकाशयोजनेसाठी द्वितीय क्रमांक भरत मोरे यांनी पटकावले. नेपथ्यासाठी प्रथम क्रमांक सुचिता महाले आणि द्वितीय क्रमांक कनिष्क बिजवे, रंगभूषेसाठी प्रथम क्रमांक विनोद देवटक आणि द्वितीय क्रमांक मिनाक्षी बावल यांनी पटकावला. उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक पुरुष विभागात अखिलेश यादव आणि स्त्री विभागात क्षितिजा भावसार यांनी पटकावले. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे एन्जल गुप्ता, ऋतुजा देसले, सलोनी लांडे, ईश्वर कळगड, समर्थ डाके, ओम सूर्यवंशी आणि करण पवार यांना मिळाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे निकालाची घोषणा केली. १५ ते १७ या कालावधीत पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली होती. या स्पर्धेत एकूण ११ नाट्यप्रयोग सादर झाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गिरीश भुतकर, वैशाली गोस्वामी आणि मंगेश दिवाणजी यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com