अधिकारी, वकीलांनी न्यायालयास सत्य 
सांगून मदतीचा दृष्टिकोन ठेवावा 

न्यायाधीश अभय एस. ओक यांचे मत

अधिकारी, वकीलांनी न्यायालयास सत्य सांगून मदतीचा दृष्टिकोन ठेवावा न्यायाधीश अभय एस. ओक यांचे मत

पुणे, ता. २६ ः ‘‘सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणेच न्यायव्यवस्थेलाही महापालिका अधिकारी, त्यांच्या वकीलांनी सत्याची मांडणी करून न्यायदानाच्या कामात मदत करावी ही माफक अपेक्षा असते. अधिकाऱ्यांनी कुठल्याही दडपणाला बळी न पडता सत्य मांडावे. सत्य मांडून न्यायदानात मदत करण्याचा दृष्टिकोन महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी व वकीलांमध्ये निर्माण झाला पाहिजे,’’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय एस. ओक यांनी रविवारी व्यक्त केले.

पुणे महापालिका व आयएलएस विधी महाविद्यालय यांच्यावतीने न्यायालयाच्या ‘महापालिका अधिकारी, वकील यांच्याकडून अपेक्षा’, शहर विकास आराखड्याचे नियोजन व महापालिका अधिकाऱ्यांची कर्तव्ये’ या विषयावर बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संदीप मारणे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विकास ढाकणे, महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ॲड. निशा चव्हाण, आयएलएस विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा पातुरकर आदी उपस्थित होते.

न्यायाधीश ओक म्हणाले, ‘‘चांगले रस्ते, पाणी, स्वच्छता, पदपथ, वीज, उद्याने असावीत आणि बेकायदा बांधकामे नसावीत, अशा सर्वसामान्य नागरिकांच्या माफक अपेक्षा असतात. केवळ जगण्याचा नव्हे, तर माणुस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपल्या परिसरात बेकायदा बांधकाम होत आहे, हे एखाद्या नागरिकाने निदर्शनास आणून दिल्यास त्याला योग्य माहिती दिली पाहिजे. अधिकाऱ्यांकडून अशी माहिती दिली जात नाही. याउलट संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याने बेकायदा बांधकामाची माहिती, कागदपत्रांमध्ये फेरबदल न करता वरिष्ठ अधिकारी, व न्यायालयास दिली पाहिजे. महापालिकेविरुद्ध खटले दाखल होतात, तेव्हा ते दोन व्यक्तींविरुद्ध नसतात, हा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. एखाद्या प्रकरणात महापालिकाच जिंकली पाहिजे, असे वाटण्यापेक्षा कायदा जिंकला पाहिजे, असे वाटून अन्यायाचे निराकण झाले पाहिजे. तरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकेल.’’

न्यायमुर्ती मारणे म्हणाले, ‘‘शहरांचा विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे. मनपा अधिकाऱ्यांनी प्रशासकीय निर्णय घेताना, विकास आराखडा तयार करताना आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.’’ यावेळी त्यांनी आवर्जून विविध न्यायनिवाड्यांची उदाहरणे दिली. या कार्यक्रमासाठी महापालिकेच्या विविध विभागप्रमुखांसह अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
----------
PNE23T32977

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com