नियंत्रण प्रणाली तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियंत्रण प्रणाली तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम
नियंत्रण प्रणाली तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम

नियंत्रण प्रणाली तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः येथील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) येथे ‘मराईन प्रपल्शन कंट्रोल टेक’च्या ७१ व्या अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सागरी अभियंत्यांना प्रशिक्षण देणे हा या मागचा उद्देश आहे.
भारतीय नौदल, सैन्यदल आणि हवाईदलातील अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित प्रशिक्षण देण्याचे कार्य मिलिट या प्रशिक्षण संस्थेद्वारे केले जाते. ही संस्था पुण्यातील खडकवासला परिसरात असून नुकतेच संस्थेमार्फत नौदलातील अधिकाऱ्यांसाठी ७१व्या मराईन प्रपल्शन कंट्रोल टेक अभ्यासक्रम सुरू केले आहे. यामध्ये भारतीय नौदलाचे ३८ तर मित्र देशातील नौदलाच्या २० अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारताची सागरी सीमा पाहता अलीकडच्या काळात सागरी सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. अशात नवनवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करणे, ते हाताळणे आवश्‍यक आहे. त्याच अनुषंगाने हा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सागरी अभियंत्यांना विद्यमान नियंत्रण प्रणाली तंत्रज्ञानावर प्रशिक्षित करणे आणि त्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हा या कोर्सचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती एकात्मिक संरक्षण विभाग मुख्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.