उपसरपंचाच्या निवडणुकीत सरपंचांना मतदानाचा अधिकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंचाच्या निवडणुकीत 
सरपंचांना मतदानाचा अधिकार
उपसरपंचाच्या निवडणुकीत सरपंचांना मतदानाचा अधिकार

उपसरपंचाच्या निवडणुकीत सरपंचांना मतदानाचा अधिकार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : उपसरपंचाच्या निवडणुकीत सरपंचांनी मतदान करायचे की नाही याबाबतच्या घोळावर अखेर पडदा पडला आहे. थेट निवडून आलेल्या सरपंचांना उपसरपंच पदाच्या पहिल्या फेरीत मतदान करण्याचा तसेच समसमान मते पडल्यास पुन्हा निर्णायक मतदान करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनतर आता उपसरपंचपदाच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. उपसरपंच पदाच्या निवडणुकांमध्ये थेट निवडून आलेल्या सरपंचांना मतदान करण्याच्या अधिकाराला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरगंबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. त्यामुळे सरपंचांच्या अधिकाराबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत नागपूर खंडपीठाने गुरुवारी निकाल देत राज्य सरकारचा ३० सप्टेंबरचा आदेश कायम केला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३३ नुसार सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीची कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत सरपंचांना मतदानाचा अधिकार असेल. तसेच त्या निवडणुकीत समसमान मते पडल्यास सरपंचांना निर्णायक मत देण्याचा हक्क असेल. उपसरपंचाची निवडणूक ही सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेणे आणि उपसरपंचाची निवड करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे उपसरपंच निवडणुकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंचांच्या कर्तव्याचा भाग आहे. न्यायालयाच्या निकालाने उपसरपंचांच्या निवडणुकीत सरपंचांना मतदान करण्याचा अधिकार कायम असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.