श्री सम्मेद शिखरजी प्रश्नासंदर्भात 
शरद पवार यांच्याशी चर्चा

श्री सम्मेद शिखरजी प्रश्नासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा

पुणे, ता. ६ ः श्री सम्मेद शिखरजी प्रश्नासंदर्भात झारखंड सरकारने देशभरातील जैन समाजाच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून श्री सम्मेद शिखरजीसंदर्भात गुरुवारी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर सकल जैन संघाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पवार यांची येथे भेट घेतली आणि त्यांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना जैन धर्मियांच्या याविषयीच्या भावना सांगितल्या. तसेच, तत्काळ यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी विनंती केली. येथील जैन समाजातील शिष्टमंडळाने पवार यांची ‘मोदी बाग’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्रसिंह यादव, झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन तसेच राज्याचे पर्यावरणमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या शिष्टमंडळाने चर्चा करताना गुजरातमधील श्री क्षेत्र पालीताना व गिरनारजी या जैन धर्मियांच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांबाबत असलेल्या प्रश्नांकडेही पवार यांचे लक्ष वेधले. या शिष्टमंडळात अचल जैन, अभय छाजेड, मिलिंद फडे, हरीषभाई शाह, लक्ष्मीकांत खाबिया, नितीन जैन, नीलेश शाह, भरत सुराणा, अरुण कटारिया, देवेंद्र बाकलीवाल, अक्षय जैन, पोपटलाल ओस्तवाल, बाळासाहेब धोका, सुरेंद्र गांधी, ॲड. योगेश पांडे आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com