किमान तापमानात घट होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमान तापमानात घट होण्याची शक्यता
किमान तापमानात घट होण्याची शक्यता

किमान तापमानात घट होण्याची शक्यता

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : गेल्या दोन दिवसांपासून असणाऱ्या काहीशा ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत असल्याचे दिसून येते. पण तरीही हवेतील गारवा मात्र कायम आहे. सकाळच्या वेळी अनेक भागात धुक्याची चादर पसरल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. दरम्यान, पुणे आणि परिसरासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात घट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये १०.३ अंश सेल्सिअस अशा सर्वाधिक नीच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात १५.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. येत्या दोन-तीन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून किमान तापमानातही घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.