रेल्वेच्या १५ स्थानकांचा होणार कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेच्या १५ स्थानकांचा होणार कायापालट
रेल्वेच्या १५ स्थानकांचा होणार कायापालट

रेल्वेच्या १५ स्थानकांचा होणार कायापालट

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः रेल्वे बोर्डाने ठरविलेल्या ‘अमृत भारत’ योजनेत पुणे विभागातील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. यामुळे स्थानकांच्या केवळ दिसण्यावरच नाही, तर प्रवासी सुविधेवरदेखील भर दिला जाणार आहे. सरकत्या जिन्यापासून ते कॅफेटेरिया, वेटिंग रूम आदीपर्यंतच्या सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
रेल्वे बोर्डाने देशातील निवडक स्थानकांचा समावेश अमृत भारत योजनेत केला आहे. यात पुणे विभागातील १५ स्थानकांचा समावेश आहे. गती शक्ती युनिटच्या वतीने स्थानक विकासाचे काम होईल. यासाठी सुमारे ७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे स्थानकाचा परिसर अधिक चांगला दिसण्यासाठी आर्किटेक्चरचीदेखील मदत घेतली जाणार आहे. २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्थानकाच्या विकासामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहे.

या स्थानकांचा समावेश
हडपसर, चिंचवड, तळेगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, बारामती, हातकणंगले, देहूरोड, लोणंद, वठार आदी स्थानकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या स्थानकांच्या विकासावर आता भर दिला जाणार आहे.

काय मिळतील सुविधा
चांगल्या दर्जाचे वेटिंग रूम, सीसीटीव्ही कॅमेरे, स्थानक परिसरात गार्डनिंग, चांगल्या दर्जाचे कॅफेटेरिया, मोफत वायफाय, स्थानकाशी जोडणाऱ्या रस्ताचे नूतनीकरण, सरकता जिना, फलाटांची उंची वाढविणे, स्थानकाच्या इमारतीला आकर्षक लुक आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

रेल्वे बोर्डाने अमृत भारत योजनेत पुणे विभागातील १५ स्थानकांचा समावेश केला आहे. स्थानकाचा विकास करताना प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य दिले आहे. लवकरच स्थानकाच्या विकासाच्या कामास सुरुवात होईल.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे