Sat, Feb 4, 2023

कथक-नादच्या नृत्याविष्काराने
श्रोते झाले नादमुग्ध
कथक-नादच्या नृत्याविष्काराने श्रोते झाले नादमुग्ध
Published on : 10 January 2023, 12:42 pm
पुणे, ता. १० ः कथक गुरू शीतल कोलवालकर यांच्या शिष्यांच्या कथक नृत्याचा ‘निरंतर’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यामध्ये ६ ते २५ वयोगटांतील नृत्यांगनांनी सादर केलेल्या बहारदार नृत्याविष्कारांनी श्रोते नादमुग्ध झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भरतनाट्यम गुरू प्रा. डॉ. परिमल फडके उपस्थित होते. तसेच पं. विजय घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी केंद्राचे संचालक आनंद देशमुख, गायक डॉ. नीरज करंदीकर आदी यावेळी उपस्थित होते.