आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे विचार ऐकण्याची संधी

आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे विचार ऐकण्याची संधी

पुणे, ता. १० : ‘सकाळ प्रकाशन’ आणि ‘सत्संग फाउंडेशन’तर्फे आध्यात्मिक गुरू, लेखक, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ श्री एम यांच्या ‘शून्य’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या सोमवारी (ता. १६) होणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुल सुतावणे आणि अनुवादक अमेय नातू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी असून ती ‘शून्य’ या आध्यात्मिक संकल्पनेवरील हे चिंतन आहे. ही कादंबरी मर्यादा आणि अथांगता तसेच वास्तव आणि पाखंडी गोष्टींमधील भिंत मोडून टाकत, समाजातील प्रचलित कुप्रथांवर भाष्य करते. सखोल ज्ञानावर आधारित अतिशय संयत असे हे कथाकथन शून्यतेच्या एका विश्वात घेऊन जाते, जिथे सखोल आणि चिरस्थायी शांतता सदैव नांदत असते, ही असीम शांतताच सर्व गोष्टींचे उगमस्थान आणि शेवट आहे.
श्री एम यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ‘भरत योग विद्या केंद्र’ कार्यरत असून या प्रकल्पाला केंद्राने मान्यता दिली आहे. श्री एम यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘पद्मभूषण’ने (जानेवारी २०२०) सन्मानित केले आहे.

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी....
‘शून्य’ या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा, अथवा sakalpublications.com वर पुस्तक विकत घेता येईल. हे पुस्तक १६ जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.


दोन दिवस कार्यक्रम....
‘सीओईपी’च्या सभागृहात सोमवारी (ता. १६) सायंकाळी ६ ते ८ या वेळात हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी ‘शून्य’ या विषयावर श्री एम वाचकांशी संवाद साधतील, आणि मंगळवारी (ता. १७) याच सभागृहात सायंकाळी ६.३० ते ८ या वेळात श्री एम यांचे ‘मानवी जीवनाचा उद्देश- साध्य करण्याचे मार्ग आणि साधने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
रसिक वाचकांना दोन दिवस श्री एम यांचे विचार ऐकण्याची बहुमूल्य संधी यानिमित्ताने मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ दिले जाणार आहे. तरी वाचकांनी कार्यक्रमस्थळी अर्धा तास आधी येऊन स्थानापन्न होऊन सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com