Fri, June 9, 2023

पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांकडून अटक
पिस्तूल बाळगणाऱ्यास पोलिसांकडून अटक
Published on : 10 January 2023, 5:11 am
पुणे, ता. १० : कोंढवा पोलिसांनी गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
उंड्रीमध्ये एका नाल्याजवळ एकजण थांबला असून, त्याच्या कमरेला पिस्तूल असल्याची माहिती पोलिस ठाणे अंमलदार लक्ष्मण होळकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी जाऊन ओमकार बाळासाहेब घुले (वय २४, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, उंड्री) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.