‘बांधकाम क्षेत्राची गरुडझेप’चे बुधवारी प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बांधकाम क्षेत्राची गरुडझेप’चे बुधवारी प्रकाशन
‘बांधकाम क्षेत्राची गरुडझेप’चे बुधवारी प्रकाशन

‘बांधकाम क्षेत्राची गरुडझेप’चे बुधवारी प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : ‘सकाळ प्रकाशन’तर्फे अभियंता आणि लेखक प्रकाश मेढेकर लिखित बांधकाम क्षेत्राची गरुडझेप या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६ वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात होणार आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुरचनाकार विश्वास कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संरचनातज्ज्ञ सतीश मराठे उपस्थित राहणार आहेत. बांधकाम क्षेत्राची गरुडझेप या पुस्तकामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, पिरॅमिड ऑफ गिजा, पिसाचा झुकलेला मनोरा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, बुर्ज खलिफा यासह विविध जगप्रसिद्ध वास्तूंच्या निर्मितीमागील कथा बांधकामविषयक शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडली आहे. तसेच घरे, शहरे, वाहतूक यांच्यासाठी आवश्‍यक असणारी बांधकामे, रचना, निर्मिती तंत्रज्ञान यामध्ये झालेले बदल आणि त्याद्वारे मानवी जीवन सुखकर होण्यासाठीची गरज याविषयीची सखोल माहिती देण्यात आली आहे. देशविदेशातील वास्तुरचना, वैविध्यपूर्ण बांधकाम साहित्य, शहर आणि घरांच्या नियोजनबद्ध रचना, पर्यावरण आणि नैसर्गिक ऊर्जेचा वापर अशा चार विभागांचा पुस्तकामध्ये समावेश आहे.

पुस्तक प्रकाशन समारंभासाठी वाचक, बांधकाम क्षेत्रातील विद्यार्थी, कर्मचारी-अधिकारी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात किंवा ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.