मॅक्स म्युलर भवनतर्फे अभिवाचन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅक्स म्युलर भवनतर्फे अभिवाचन कार्यक्रम
मॅक्स म्युलर भवनतर्फे अभिवाचन कार्यक्रम

मॅक्स म्युलर भवनतर्फे अभिवाचन कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः पुण्यातील तरुणांमध्ये भाषिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्याच्या उद्देशाने अलियान्स फ्राँसेज आणि ग्योथं-इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन यांच्यातर्फे अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २२) सायंकाळी ७ वाजता बोट क्लब रस्ता येथील ग्योथं-इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूलर भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमात आंनद चाबुकस्वार आणि अंगद पटवर्धन हे फ्रेंच तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर आणि प्रशियाचा राजा फ्रेडरिक दुसरा यांच्यात झालेल्या पत्रसंवादातील काही महत्त्वपूर्ण भागांचे अभिवाचन करतील. ‘ऑफ फिलोसॉफर्स ॲण्ड किंग्ज’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती रेनबो अंब्रेला फाउंडेशन यांनी केली आहे. तर कार्यक्रमाचे लेखन डॉ. नंदिता वागळे व दिग्दर्शन अनुपम बर्वे यांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी www.tickitkhidakee.com या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.