प्लॉटिंग, महागड्या घरांमध्ये अधिक गुंतवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लॉटिंग, महागड्या 
घरांमध्ये अधिक गुंतवणूक
प्लॉटिंग, महागड्या घरांमध्ये अधिक गुंतवणूक

प्लॉटिंग, महागड्या घरांमध्ये अधिक गुंतवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : कोरोनाच्या साथीनंतर स्वतःच्या घराची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे आता नागरिकांची प्लॉटिंग आणि महागड्या घरांनाही मागणी वाढत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील या दोन्ही बिझनेस मॉडेलमधील गुंतवणूक व व्यवहार वाढणार आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत हीच स्थिती राहील, अशी शक्यता बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

महागड्या गृहनिर्माणला पसंती
शहराच्या जवळ स्वतःचे प्लॉटिंगमध्ये घर असावे, तसेच शहरापासून काही अंतरावर सेकंड होम बांधावे, मोठ्या आकाराचे घर घेणे असा ट्रेंड सध्या वाढवा आहे. घर खरेदीदारांकडून होत असलेली ही मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच एक पर्यायी व्यवसाय मॉडेल म्हणून बांधकाम व्यावसायिक आता प्लॉटिंगचा विचार करीत आहेत. याबाबत समजून घेण्यासाठी ‘क्रेडाई’, ‘कॉलियर्स’, ‘लियासेस फोरस’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक सर्व्हे घेतला. त्यात प्लॉटिंग आणि महागड्या घरांची निर्मिती करण्याला सर्वाधिक व्यावसायिकांनी पसंती दिली आहे.

पाच बिझनेस मॉडेल -
ब्रँडेड व महागडी घरे, ज्येष्ठांसाठीची घरे, प्लॉटिंग, गोदाम व लॉजिस्टिक पार्क, को-वर्किंग स्पेस

राज्य - या दोन बिझनेस मॉडेलला पसंती
महाराष्ट्र - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
आंध्र प्रदेश - ब्रँडेड व महागडी, घरे ज्येष्ठांसाठी घरे
बिहार - प्लॉटिंग, को-वर्किंग स्पेस
छत्तीसगड - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
दिल्ली - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
गोवा - ब्रँडेड व महागडी घरे, घरे ज्येष्ठांसाठी घरे
केरळ - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
गुजरात - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
हरियाना - प्लॉटिंग, गोदाम व लॉजिस्टिक पार्क
कर्नाटक - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
झारखंड - ब्रँडेड व महागडी घरे, -
मध्यप्रदेश- ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
राजस्थान - प्लॉटिंग
तमिळनाडू - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
तेलंगण- ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
उत्तर प्रदेश - ब्रँडेड व महागडी घरे, प्लॉटिंग
पश्चिम बंगाल - ब्रँडेड व महागडी घरे
ओरिसा- गोदाम व लॉजिस्टिक पार्क

देशात लक्झरी घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक तज्ञांचा अंदाज आहे की, हा कल २०२३ अखेरपर्यंत कायम राहील. याचे मुख्य कारण हे डिस्पोजेबल उत्पन्न आणि वाढते शहरीकरण आहे.
- आनंद नाईकनवरे, प्रमुख, बिझनेस प्रोसेस, नाईकनवरे डेव्हलपर्स

महागड्या घरांना मागणीची कारणे
- राहणीमानाचा वाढता दर्जा
- पुण्यातील बांधकाम क्षेत्राची होत असलेली वाढ
- उद्याने, क्लब हाऊस, खेळाचे क्षेत्र, शेती, काँक्रिट रस्ते इत्यादी सुविधांची मागणी
- स्वतंत्रपणे जगण्याची संधी
- गेट्स कम्युनिटीमध्ये राहण्याचे फायदे
- शहरीकरणाचा टप्पा, विकास नियंत्रण नियमावलीतील स्थिरता
- जागेची किंमत आणि वापरण्यास मिळणाऱ्या जागेचे गणित

कोरोनामुळे घरांची पसंती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. त्यामुळे आता अनेकजण प्लॉटिंगमध्ये जागा घेऊन घर बांधत आहेत. फक्त सेकंड होम नाही तर पहिले घर म्हणून अनेकजण प्लॉटिंगचा पर्याय निवडत आहेत. पहिले घर असलेल्यांचे प्रमाण त्यात सर्वाधिक आहे. तर बदललेली जीवनशैली, कुटुंबाचा गरजा, वर्क फॉर्म होम ही ब्रँडेड व महागडी घरे घेण्याचे कारण आहे.
- सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

२०२३ मध्ये घरांची मागणीबाबत
व्यवसायिकांनी व्यक्त केलेले मत (टक्केवारीत)
राज्य - २६-५० टक्के वाढ हार्इल - मंदी अपेक्षित आहे - मागणी स्थिर असेल - २५ टक्के मागणी वाढेल
महाराष्ट्र - ५ - १७ - ४३ - ३५
आंध्र प्रदेश - ० - ४०- ६० - ०
बिहार - ७ - ७ - ४३ - ४३
छत्तीसगड - ६- १८- ५९- १८
दिल्ली - ० - ० - ८६ - १४
गोवा - ० - ० - ६७ - ३३
गुजरात - १०- १९ - ४३ - २९
हरियाना - ० - ० २० - ८०
झारखंड - ३३ - ३३ - ३३ -०
कर्नाटक - १० - २३ - ३५ - ३३
केरळ - १४ - ० - ४३ - ४३
मध्य प्रदेश- १७ - १७ - ५० - १७
ओडिशा- ० - ० - ० - १००
राजस्थान -० - ० - ० - १००
तमिळनाडू - ७ - २४ - ४१ - २४
तेलंगण- ६ - २९ - ३५ - २९ -
उत्तर प्रदेश - १३ - ० - ५० - ३८
पश्चिम बंगाल - ७ - २७ - ५७ - २०
एकूण - ७ - १८ - ४३ - ३१