डेटा सायन्स, ॲनालिटिक्सवर आजपासून आंतरराष्ट्रीय परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेटा सायन्स, ॲनालिटिक्सवर 
आजपासून आंतरराष्ट्रीय परिषद
डेटा सायन्स, ॲनालिटिक्सवर आजपासून आंतरराष्ट्रीय परिषद

डेटा सायन्स, ॲनालिटिक्सवर आजपासून आंतरराष्ट्रीय परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) आणि सोसायटी फॉर डेटा सायन्सतर्फे (एस४डीए) ‘डेटा सायन्स, ॲनालिटिक्स अँड इनोव्हेशन २०२३’ (आयसीडीएमएआय) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तीन दिवसीय परिषद शुक्रवार (ता. २०) ते रविवार (ता. २२) या कालावधीत होणार आहे.
आयसीडीएमएआ २०२३ चा उद्देश डेटा सायन्स क्षेत्रातील संशोधन आणि विकास उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि संशोधक, विकासक, अभियंते, विद्यार्थ्यांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणणे तसेच वैज्ञानिक माहितीचे देवाणघेवाण करणे हा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ), सीडॅकचे शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, उद्योग तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन, कार्यशाळा आणि चर्चा यांचा समावेश आहे. याशिवाय मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा संकलन, महामारी हाताळण्यासाठीचे सक्षम तंत्रज्ञान आदी विषयातील शोधनिबंध सादर केले जाणार आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आदी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.