Thur, Feb 2, 2023

बांगलादेशी नागरिकांना अटक
बांगलादेशी नागरिकांना अटक
Published on : 21 January 2023, 9:03 am
पुणे, ता. २० : पासपोर्ट तसेच कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या पुण्यात राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ज्वेल अख्तर अली खान (वय २६) आणि मायमुना अख्तर शिउली (वय २९, दोघेही रा. बांगलादेश) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार नारायण रामसुब्बया चलसाणी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना गुरुवारी (ता. १९) बुधवार पेठेमधील क्रांती हॉटेल समोरून अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.