महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ४५ कोटींची अनामत पडून विधानसभेतील तारांकित प्रश्नाला उत्तर; इबीसी विद्यार्थ्यांसाठी विनियोगाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ४५ कोटींची अनामत पडून 

विधानसभेतील तारांकित प्रश्नाला उत्तर; इबीसी विद्यार्थ्यांसाठी विनियोगाची मागणी
महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ४५ कोटींची अनामत पडून विधानसभेतील तारांकित प्रश्नाला उत्तर; इबीसी विद्यार्थ्यांसाठी विनियोगाची मागणी

महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ४५ कोटींची अनामत पडून विधानसभेतील तारांकित प्रश्नाला उत्तर; इबीसी विद्यार्थ्यांसाठी विनियोगाची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेतली जाते. मात्र, शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यांना ही रक्कम परत केली जात नाही. अशी तब्बल ४५ कोटी २३ लाख ८९ हजार ९०२ रुपयांची रक्कम राज्यातील विविध महाविद्यालयांकडे पडून असल्याची माहिती विधानसभेतील एका तारांकित प्रश्नामुळे समोर आली आहे.

उच्च शिक्षण विभागाने ऑगस्ट २०२२ मध्ये सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांकडून शिल्लक अनामत रकमेची माहिती मागवली होती. त्याचे सविस्तर वृत्त उच्च शिक्षण मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना दिले असून, नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्नाला हे लेखी उत्तर देण्यात आले आहे. ज्यात उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांत १४ कोटी, तर तंत्रशिक्षण महाविद्यालयांकडे १२ कोटी इतकी अनामत रक्कम शिल्लक असल्याचे म्हटले आहे. या रकमेतील ३० टक्के रक्कम आर्थिक दृष्ट्या मागास (इबीसी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी खर्च कराव्यात, अशी मागणी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी (कॉप्स) या संघटनेने केली आहे.

अनामत रक्कम म्हणजे काय?
महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून काही रक्कम तारण अनामत रक्कम घेतली जाते. ज्यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा आदींच्या शुल्काचा समावेश असतो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयातून बाहेर पडतो, त्यावेळी ही रक्कम परत देणे अपेक्षित आहे. पण, बऱ्याचदा विद्यार्थी ही रक्कम घेत नाही. तर काही महाविद्यालये टीसी काढताना ही रक्कम देतात.

रकमेचा परस्पर वापर...
सहसंचालक विभागाची परवानगी न घेताच अनुदानित महाविद्यालयांनी अनामत रक्कम खर्च केली असल्याचा आरोप कॉप्स संघटनेने केला आहे. उच्च शिक्षण विभागातील एक हजार ९३६ विना अनुदानित महाविद्यालयातील शिल्लक अनामत रक्कम विनियोग कसा करावा, या बाबतचा शासन निर्णय तत्काळ काढावा. उच्च शिक्षण विभागातील २८ शासकीय महाविद्यालय शिल्लक अनामत रक्कम कोणत्या नियमाच्या आधारे शासकीय कोशागारात जमा करत आहे, याची माहिती देण्यात आली नसल्याचेही संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी केली आहे.

विभागानुसार शिल्लक रक्कम..
विभाग ः शिल्लक अनामत रक्कम
पुणे ः ८, ८०,५६,०००
मुंबई ः १५,३२,७१,६२७
कोल्हापूर ः ५,८५,३४,५६०
सोलापूर ः ६६,९६,८१७
औरंगाबाद ः ५३,८३,३०१
अमरावती ः ५,२७,०१५
जळगाव ः ४,८४३०,७०४
पनवेल ः ८,४४,५९,८२०
नागपूर ः ७०,३०,०५८
नांदेड ः अप्राप्त
एकूण ः ४५,२३,८९,९०२